Advertisement

ते पुन्हा येणार! 1 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात

ते पुन्हा येणार! 1 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आहे. बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. विरोधात निकाल गेल्यानं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.

फक्त इतकंच नाही तर त्यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता शिवसेनेचीच धुरा हाती घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान आज आमदारांच्या मार्गात येऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय. उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतर भाजपचे सर्व नेते, आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत असून जोरदार सेलिब्रेशन झालं.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.



हेही वाचा

Exclusive - देवेंद्र फडणवीस नवीन सभापती नियुक्त करतील

“रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखानी मोठं केलं त्यांनीच खेचलं”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा