Advertisement

“रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखानी मोठं केलं त्यांनीच खेचलं”

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

“रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखानी मोठं केलं त्यांनीच खेचलं”
SHARES

रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखानी मोठं केलं, त्यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरु खाली खेचण्याचं पुण्य कमावलं, त्यांना ते कमवू द्या असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या लोकांवर मी विश्वास ठेवला हे माझं पाप आहे, त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ज्यांना पद देऊन मोठं केलं ते सोडून गेले. पण ज्यांना काहीनाही दिलं ते आज माझ्यासोबत आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यापुढे आता शिवसेना भवनमध्ये बसून शिवसेनेचे काम करणार असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शिवसेना ही आपलीच आहे, ती आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असंही ते म्हणाले.

उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझं आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला.

त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं.

ते पुढे म्हणाले, एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचं आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय.हेही वाचा

उद्या शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन

उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा