Advertisement

उद्या शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन

शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य त्यांच्या पदरात पडत असेल तर पडूदे, असं उद्ध ठाकरे म्हणाले.

उद्या शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन
SHARES

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत राजिनाम्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच शिवसैनिकांना उद्या गोंधळघालू नये असे आवाहन केलं आहे.

उद्या म्हणजेच गुरुवारी बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत. हे आमदार बहुमत चाचणीसाठी विधानभवनात येतील. थेट मुंबई विमानतळावरून हे विधानभवनात येणार आहेत. त्यामुळे उद्या शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा विरोध केला जाऊ शकतो. कुठलाच गोंधळ होऊ नये म्हणून मुंबई विमानतळ ते विधानभवन सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये
उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे. ते पाप माझं आहे, त्यांच्यावर विश्वास मी ठेवला.

त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं.

ते पुढे म्हणाले, एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचं आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय.

महाविकास आघाडी सरकारची संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच, मला माझ्याच लोकांनी धोका दिलाय, असं म्हणताना ते भावूक झाले.हेही वाचा

उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं

महाविकास आघाडीला दिलासा नाहीच, उद्याच होणार बहुमत चाचणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा