सी विभागातील प्रभाग घटले

 Pali Hill
सी विभागातील प्रभाग घटले
Pali Hill, Mumbai  -  

गिरगाव - महापालिका प्रभाग पुर्नरचनेत शहरातील काही प्रभाग घटले आहेत. शहरात मोडणाऱ्या सी विभागातील प्रभागांची संख्या एकने घटली असून, नव्या रचनेनुसार या विभागात तीन प्रभाग राहिले आहेत.

सी विभागमध्ये 2012 महापालिका निवडणुकीत 4 प्रभाग होते. मात्र ते आता कमी होऊन तीन वर आले असून प्रभाग नंबर देखील बदलण्यात आले आहे..217, 218,219,220 प्रभाग नंबर मध्ये बदल करून 220,221,222 करण्यात आला आहे..दोन प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला असून एक प्रभाग खुला वर्ग करण्यात आला आहे.

2017 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलेले प्रभाग व आरक्षित विभाग

प्रभाग क्रमांक 220 खुला प्रवर्ग

प्रभाग क्रमांक 221 इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)

प्रभाग क्रमांक 222 सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)

Loading Comments