होर्डिंगबाजीतून श्रेयासाठी धडपड

    मुंबई  -  

    घाटकोपर - महापालिका निवडणूक जवळ आल्यानं आजी नगरसेवक आणि इच्छुकांनी आपल्या कार्याची जाहिरातबाजी सुरू केलीये. घाटकोपरमध्ये तर नगरसेवकांनी होर्डिंग्जबाजीच सुरू केलीये आणि ही होर्डिंग लावताना कुणाची परवानगीही घेतलेली नाही. नगरसेविका भारती बावदाणे यांनी परिसरातल्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला, असा दावा होर्डिंगमधून केलाय.या बाबतीत स्थानिकांचं म्हणणं मात्र वेगळं आहे.तर घाटकोपर पूर्व पंतनगरच्या नगसेविका राखी जाधव यांनी सावरकर चौकात लाद्या बसवल्या, मैदानाचं नूतनीकरण केलं, अशी होर्डिंग लावलीयेत. पण त्या कधी इकडे फिरकल्याच नाहीत, असं स्थानिक सांगतात. नगरसेवकांचे दावे किती खरे आणि किती खोटे हे महापालिका निवडणुकीचा निकाल सांगेलच. पण या निमित्तानं सुरू झालेली होर्डिंगबाजी मुंबई बदसूरत करतेय, हे मात्र नक्की!

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.