Advertisement

गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्याचं बांधकाम शिवसेनेने रोखलं


गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्याचं बांधकाम शिवसेनेने रोखलं
SHARES

गिरगाव चौपाटीवर आ. मंगलप्रभात लोढा यांच्या आमदार निधीतून एक कबुतरखाना बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. हे बांधकाम अनधिकृत असल्याचं म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हे काम रोखलं. जैनांकडून हे अनधिकृत बांधकाम केलं जात असून चौपाटी ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक नेते पांडुरंग सकपाळ यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला.

आ. लोढा यांच्या आमदार निधीतून चौपाटीच्या मधोमध कबुतरखान्याचं बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बुधवारी मिळाली. त्याबरोबर शिवसैनिकांनी त्वरीत चौपाटीवर धाव घेत पालिकेकडे तक्रार केली. 

या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने हे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या दाव्यानुसार महापालिकेने हे काम त्वरीत बंद करावं, अशी मागणीही शिवसैनिकांनी उचलून धरली.

या मागणीनुसार हे बांधकाम महापालिका उपायुक्त सुहास करंवदे यांच्या आदेशानुसार पाडण्यात आल्याचंही सकपाळ यांनी स्पष्ट केलं. यापुढे  कोणत्याही परिस्थितीत अशी अनधिकृत बांधकामे चौपाटीवर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

चौपाटीचा परिसर हेरिटेजमध्ये समाविष्ट असून येथे कोणतंही बांधकाम करता येत नाही. आणि करायचं असल्यास त्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. असं असताना या कामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा शिवसेनेने केला.



तोडफोड नाही

शिवसैनिकांनी चौपाटीवर मोठ्या संख्येने धाव घेत पालिकेच्या कारवाईआधीच बांधकाम बंद करत कबुतरखान्याची तोडफोड केल्याचं वृत्त आहे. मात्र हे वृत्त साफ खोटं असून ही तोडफोड नसून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई असल्याचंही सकपाळ यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं.


जैन, भाजपविरोधात पुन्हा शिवसेनेकडून गरळ 

मिरा-भाईंदर निवडणुकीदरम्यान जैनांचा मुद्दा एेरणीवर आल्यापासून शिवसेना जैनांविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. बुधवारी गिरगाव चौपाटीवरही हेच दिसून आलं. तर दुसरीकडे भाजपच्या आमदाराकडून हे काम करण्यात येत असल्याने भाजपविरोधातील राग यावेळी दिसून आला. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा