बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवर बुधवारी शिक्कामोर्तब

  Pali Hill
  बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवर बुधवारी शिक्कामोर्तब
  मुंबई  -  

  मुंबई - महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. आता याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीपुढे मंजुरीला येतोय. शिवाजी पार्कच्या महापौर निवासाची जागा बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक समितीला 30 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा हा प्रस्ताव आहे. आचारसंहिता कधीही लागू होईल हे लक्षात घेता बुधवारी होणाऱ्या सुधार समिती सभेत यावर महापालिकेकडून शिक्कामोर्तब होणार आहे.

  सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ही जागा निश्चित केली. त्यानुसार गेल्या आठवड्यात महापौर निवासाची जागा बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक समितीला देण्याचा निर्णय घोषित झाला. त्यानुसार महापालिकेच्या मालमत्ता विभागानं ही जागा स्मारक समितीला देण्याचा प्रस्ताव तयार केला. हा ठराव बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. हा प्रस्ताव मंजूर झाला की, नगरविकास खात्याच्या अध्यादेशानुसार 30 वर्षांसाठी ही जागा बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक समितीला देण्यात येईल. सुधार समितीत हा प्रस्ताव मंजूर झाला की, सर्वसाधारण सभेपुढे मांडला जाईल, असं मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी स्पष्ट केलं. तर सरकारच्या आदेशानुसार हा प्रस्ताव आल्यानं तो निश्चितच सर्वानुमते मंजूर होईल, असं सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी म्हटलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.