Advertisement

मुंबई महापालिका बनवणार पिंपरी चिंचवडचा 'डिपी'


मुंबई महापालिका बनवणार पिंपरी चिंचवडचा 'डिपी'
SHARES

मुंबईचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लान) यशस्वीरित्या बनवणारी मुंबई महापालिका आता पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा बनवणार आहे. महापालिकेच्या विकास नियोजन विभागामार्फत पिंपरी चिंचवडचा विकास आराखड बनवण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महापालिकेला सुमारे ८ कोटी रुपये दिले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीसह एमएमआरडीएच्या हद्दीचा विकास आराखडा मुंबई महापालिकेने बनवला आहे.


प्रधान सचिवांना पत्र

मुंबई महापालिकेचा २०१४-३४ चा विकास आराखडा २७ मे २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या अभियंत्यांनी मुंबईचा हा विकास आराखडा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुधारीत केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून पिंपरी चिंचवड शहाराचा विकास आराखडा बनवण्यासाठी मुंबई महापालिकेचा विचार करावा, असे पत्र नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना पाठवले होते.


स्थायी समितीची मंजुरी

नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्रानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना दुसऱ्यांदा सुधारीत करण्यासाठी मुंबई महापालिकेचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी यासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती व त्याकामीचा अपेक्षित खर्च याचा तपशिल कळवण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी विचारले होते, त्याप्रमाणे त्या शहराचा विकास अराखडा बनवण्याचा काम महापालिकेने घेतले असून याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीपुढे मांडले. या निवेदनाला स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मंजुरी दिली आहे.


'ना नफा ना तोटा' तत्वावर

विकास आराखडा सुधारीत करण्याचे काम हे तांत्रिकदृष्ट्या विशेष प्रकारचे असून एम.सी.एम.सी.आर केंद्राचे पहिलेचे काम आहे. त्यामुळे 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे काम करण्यात येणार असल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले. हे काम विकास नियोजन खात्यातील अभियंत्यांमार्फत आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर नियोजनकारांच्या व संगणकीय भौगोलिक महिती प्रणाली तज्ज्ञांच्या मदतीने हे काम करण्यात येणारअसल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.


विशेष प्रशिक्षण वर्ग

म्हाडाने पवई येथे समायोजन आरक्षणांतर्गत बांधून दिलेल्या महापालिका प्रशिक्षण इमारतींमध्ये इतर महापालिका व नगरपालिका यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकरता विशेष प्रशिक्षण वर्ग भरवले जातात. त्या महापालिका व नगरपालिका यांच्या आवश्यकतेनासर तांत्रिकदृष्ट्या विशेष प्रकारची काम मुंबई महापालिकेमार्फत करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपासिटी बिल्डींग अँड रिसर्च (एम.सी.एम.सी.आर) हे केंद्र स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा -

७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं नवं अस्त्र?

कचरा विल्हेवाटीची सक्ती म्हणजे भष्टाचाराचं नवं कुरण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा