Advertisement

७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं जुनंच अस्त्र?


७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं जुनंच अस्त्र?
SHARES

वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर येथील झोपड्यांवर कारवाई सुरु असतानाच गॅस सिलिंडर स्फोट होऊन आगीची दुघर्टना घडली. इथे हे पहिल्यांदा घडलेलं नाही. तर मागील ७ वर्षांत गरीब नगरच्या झोपड्यांना लागलेली ही आगीची तिसरी घटना आहे. जेव्हा जेव्हा महापालिका आणि रेल्वेने येथील झोपड्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तेव्हा आगीने या कारवाईला वेगळं वळण मिळालं आहे. यंदाही तसंच काहीसं घडलं असलं, तरी ही कारवाई सुरुच राहणार असल्याचं एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी स्पष्ट केलं.


आग लावली की लावली?

न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनीवरील झोपड्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी गरीब नगर येथील झोपड्यांवर महापालिका आणि रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू असताना सायंकाळी पावणे चारच्या सुमारास गॅस सिलिंडर स्फोट लावून आग लागली. गरीब नगरला सर्वप्रथम मार्च २०११ मध्ये आग लागली होती. त्यानंतर २०१४ मध्ये आग लागली अाणि आता गुरुवारी पुन्हा आग लागली. ७ वर्षांत तब्बल तीन वेळा आग लागण्याचे प्रकार घडले असून या तिन्ही वेळेला येथील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका आणि रेल्वेने कारवाई हाती घेतली होती. ज्यावेळेला महापालिका रेल्वेसोबत कारवाई हाती घेते, त्या त्यावेळेला आग लागून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जातो. त्यामुळे गुरुवारी लागलेली आगही याच हेतूने लावण्यात आली असावी, असं म्हटलं जात आहे.


सर्व झोपड्या कमर्शियलच

गरीब नगरमधील झोपड्यांना सर्वप्रथम २०११ मध्ये लाग लागल्यानंतर सरकारच्यावतीने या सर्व झोपड्या तात्पुरत्या बांधून देण्यात आल्या होत्या. तळ अधिक एक पोटमाळा अशाप्रकारे १४ फुटांपर्यँत पत्र्यांचं घर बांधून दिल्यानंतर पुन्हा याठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृत मजले वाढवून झोपड्यांचे टॉवर उभारण्यात आले. मात्र, याठिकाणी निवासी ऐवजी कर्मर्शियल गाळे म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक घराला कोट्यवधी रुपयांचा भाव आला होता. प्रत्येक गाळ्याला हजारो रुपयांचे भाडे आकारले जात असल्याचे स्थानिकांकडूनच समजते.यापूर्वी झालेल्या आगीच्या दुघर्टनेत रेल्वेचे पूलही बाद झाले होते. त्यानंतर रेल्वेने युद्धपातळीवर या पुलाची उभारणी करावी लागली होती. मात्र या दुघर्टनेनंतर तत्कालिन खासदार प्रिया दत्त, आमदार बाबा सिद्धीकी यांच्यासह नारायण राणे आदींनी भेट या लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.


कारवाई सुरुच राहणार 

न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनी लगतच्या झोपड्या हटवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार त्यांना रितसर नोटीस जारी करून ही रेल्वे प्रशासनाच्या मदतीने महापालिकेने संयुक्त कारवाई हाती घेतली होती. याठिकाणी सुमारे ३०० झोपड्या आहेत. त्यातील ६० ते ७० झोपड्यांवर आगीची दुघर्टना घडण्यापूर्वीच कारवाई करण्यात आली होती. सन २०१५ पासून या सर्वांना नोटीस पाठवली जात आहे. परंतु महापालिकेच्या नोटीसबाबत हे रहिवाशी गंभीर नसल्यामुळे अखेर न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार दुसऱ्या टप्प्यातील कारवाई हाती घेतली आहे. आगीच्या दुघर्टनेनंतर ही कारवाई कुठेही न थांबता पुढे चालूच राहिल, असं एच- पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

आग लागो त्या मतांच्या राजकारणाला!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा