Advertisement

'आणि चाललेत राणेंना मंत्री बनवायला' - पटोले


'आणि चाललेत राणेंना मंत्री बनवायला' - पटोले
SHARES

'राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, हे १० लाख शेतकऱ्यांना बोगस ठरवतात आणि चाललेत नारायण राणे यांना मंत्री बनवायला' अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार नाना पटोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नारायण राणे जर भाजपामध्ये येत असतील तर मी माझे खाते सोडायला तयार आहे, असे काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. या वक्तव्याचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला.


म्हणून माझे नाव नाना आहे -

'एखादा मंत्री १० लाख शेतकरी बनावट आहेत, असे म्हणत असेल तर त्याला सरळ करणे आमचे काम आहे' असे सांगत मी समोर येऊन 'फाईट' करतो म्हणून माझे नाव नाना आहे' असे देखील त्यांनी सांगितले.
'मुख्यमंत्री माझे मित्र आहेत, मात्र ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफी करतात त्याचा आम्ही विरोध केला आहे. त्यामध्ये कोणतेच राजकारण नव्हते. जे काही आहे ते मी समोर बोललो', असे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. 


हेही वाचा - 

लालबागचा 'नाना' भाजपात



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा