'सर्जिकल स्ट्राईकचा राजकारणासाठी वापर'

 Vidhan Bhavan
'सर्जिकल स्ट्राईकचा राजकारणासाठी वापर'
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉईंट - काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित केली आहे. ''यापूर्वी कधीही सर्जिकल स्ट्राईकचा राजकारणासाठी वापर झालेला नाही'', ''पाकिस्तानवर कारवाई व्हायलाच हवी'', ''पण राजकारण होऊ नये'', अशी टीका निरुपम यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देखील त्यांनी सरकारकडे मागितले. तसेच खोटा हल्ला घडवून आणल्याचा थेट आरोपही भाजप सरकारवर केला. यापूर्वी त्यांनी ट्विट करून टीका केली होती.

Loading Comments