सट्टे बाजारातही भाजपाचा बोलबाला

 Mumbai
सट्टे बाजारातही भाजपाचा बोलबाला

मुंबई - उत्तर प्रदेशच्या निवडणूकीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलंय ते निकालांकडे. एकीकडे एक्झिट पोलच्या सर्वेनुसार भाजपा नंबर वन पक्ष ठरलाय. सुरुवातीला सपा आणि काँग्रेसला बहुमत देणाऱ्या सट्टे बाजाराचं मत शेवटच्या टप्प्यात झालेल्या हालचालीमुळे चांगलंच बदललं आहे. बुकीचा अंदाज आहे की युपीत भाजपाला जवळपास 190 ते 200 जागा मिळतील. सट्टेबाजारातल्या एका नामचिन बुकींच्या सांगण्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होणार असं वाटतं. यावेळी सट्टेबाजारात जवळपास 50 हजार कोटींच्या घरात ही उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.

सट्टेबाजारात सध्याचा भाव पुढील प्रमाण

भाजपा

सीट     भाव
170     22 पैसे
180     62 पैसे
190     62 पैसे
200     1.35 पैसे

समाजवादी पार्टी

सीट         भाव
120       32 पैसे
130       68 पैसे
140       68 पैसे
150      1.80 रुपये
160      2 रुपये

बसपा
सीट    भाव
30    40 पैसे
40    85पैसे
50    1.35रुपये
60     2.50 रुपये

काँग्रेस
सीट   भाव

10    42पैसे
15    42 पैसे
20    2.50रुपये
25    3.25रुपये

उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या 8 सीटवर विजय मिळवलेल्या भाजपासाठी करो या मरो असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. अखेरचे 3 दिवस भाजपाने सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: रोड शो करत होते. त्यामुळे सट्टेबाजारात 7 जागांवर भाजपाला यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाराणसीमध्ये भाजपावर लागलेला भाव

सीट      भाव
4         22 पैसे
5         52 पैसे
6       1.10 पैसे
7       1.90 पैसे

Loading Comments