इव्हीएम मशीनविरोधात बसपाचे आंदोलन

 Azad Maidan
इव्हीएम मशीनविरोधात बसपाचे आंदोलन
Azad Maidan, Mumbai  -  

इव्हीएम मशीनविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसह 5 राज्यांतील निवडणुका आणि महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक 2017 मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत भाजपाने निवडणुकांमध्ये मशीनचा गैरवापर केल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत इंगळे म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये दलित आणि मुस्लिम समाजाने बसपाला मतदान केले होते. मग ती मते भाजपाला कशी मिळाली यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बसपासह इतर राजकीय पक्षांनी इव्हीएम मशीनविरोधात आवाज उठवला आहे. इव्हीएम मशीनचा वापर रद्द करून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले.

या आंदोलनात मुंबईसह राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय सचिव खासदार वीरसिंह यांनी केले. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विलास गरूड, अनिल पवार, रामसुंदर जयस्वाल, सुरेश महाडिक, विजय जाधव उपस्थित होते.

Loading Comments