'बाबरीच्या जागेवर सरकारी रुग्णालय बांधावे'

  CST
  'बाबरीच्या जागेवर सरकारी रुग्णालय बांधावे'
  मुंबई  -  

  सीएसटी - गेली अनेक वर्षे राम मंदीर, बाबरी मशीद वाद सुरु आहे. या वादामुळे देशात मनुष्यहानी, वित्त हानी झालेली आहे. यावर सुप्रीम कोर्टाने आता आपापसात तडजोड करायला सांगितले आहे. मात्र कोणीही समोर येत नसल्यामुळं राम मंदिर बाबरी मशीद कृती समितीने पुढाकार घेतला आहे. सदर ठिकाणची जागा कोर्टाने ताब्यात घेऊन राम रहीम नावाचे सरकारी हाॅस्पिटल बांधावे अशी मागणी कृती समिती करणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

  येत्या 29 मार्चला दिल्ली येथे महाराष्ट्र सदन या ठिकाणी त्या संदर्भात एक मोठी बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यात हिंदू, मुस्लीम समाजाचे सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे अधिकारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, ओवैसी बंधू, मुस्लीम बोर्ड, स्वामी सुब्रमण्यम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मीटिंगमध्ये राम मंदिर, बाबरी मशीदबद्दल कुठलाही निर्णय न झाल्यास 30 मार्च रोजी राम मंदिर बाबरी मशीद कृती समिती सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.