संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला आंदोलनाचा इशारा

  Dadar
  संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला आंदोलनाचा इशारा
  मुंबई  -  

  मुंबई - संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात संघर्षाची शक्यता आहे. दादरच्या शिवसेना भवन येथे लावलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र त्याचं कारण ठरू शकेल. संभाजी ब्रिगेडनं या संदर्भात एक पत्रक काढलं आहे. शिवसेना भवन येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे. हा क्रम चुकीचा आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा वरती असायला हवा, असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे.

  संभाजी ब्रिगेडनं विविध कारणांसाठी यापूर्वी मोडतोड केली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून पुण्यातल्या भांडारकर संस्थेत केलेली मोडतोड, नवी मुंबईतल्या सामनाच्या कार्यालयावर दगडफेक तर पुण्यातल्या एका उद्यानातून हटवलेला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा. संभाजी ब्रिगेडनं केलेली ही आंदोलनं गाजली होती. आता संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक सुहास राणे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलंय की, शिवसेनेनं शिवसेना भवन येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र याचा क्रम बदलला नाही, तर तीव्र आंदोलन केलं जाईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.