निवडणूक तिकिटासाठी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये रस्सीखेच

  Dahisar
  निवडणूक तिकिटासाठी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये रस्सीखेच
  मुंबई  -  

  दहिसर - महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहे. वॉर्ड क्रमांक 1मधून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आहे. भाजपाचे स्थानिक नेता राम यादव यांनी या वॉर्डमधून तिकीट मागितलं आहे. पण, भाजपा पदाधिकारी राम यादव यांना तिकीट न देता भाजपा नेता रामबृक्ष यादव यांची नात दीपा यादव यांना तिकीट देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राम यादव यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर भाजपाकडून त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते दुसऱ्या पार्टीतून किंवा अपक्ष निवडणूक लढवतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.