आधी कपबशी आता मशीन!

 Kandivali
आधी कपबशी आता मशीन!
Kandivali, Mumbai  -  

कांदीवली - वॉर्ड क्रमांक 39 च्या क्रांतीनगरमधील रासपच्या उमेदवार सुमन सिंह यांना आता कपबशीच्या चिन्हाऐवजी मशीनच्या चिन्हाचे फलक लावावे लागणार आहेत. आधी त्यांना निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह दिले होते. त्यामुळे त्यांनी कपबशी चिन्ह असलेले फलक देखील तयार केले होते. मात्र अचानक सहा दिवसांनंतर त्यांचं चिन्ह निवडणूक आयोगाने बदलल्याने त्यांना पुन्हा नवीन फलक बनवावे लागणार आहेत. सुमन सिंह यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

Loading Comments