Advertisement

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण व्हिडिओ वायरल

कामगाराकडे परवानगी नसल्यामुळे कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण व्हिडिओ वायरल
SHARES

राज्याचे अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक यांचे बंधु आणि राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक कप्तान मलिक यांचा कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. खोदलेल्या रस्त्यात विना परवानगी काम करत असल्याच्या कारणांवरून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असून ती कामे विविध कंपन्यांना कंत्राटावर दिली आहेत. अशाच एका रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी काही कामगार काम करत असताना. त्या ठिकाणी नगरसेवक कप्तान मलिक यांनी त्यांच्याजवळ सुरू असलेल्या कामाची परवानगी मागितली. मात्र कामगाराकडे परवानगी नसल्यामुळे कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच न थांबता कामगारांना शिवीगाळ करत परत या परिसरात दिसल्यास हात पाय तोडण्याची ही धमकी दिल्याचे व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. कप्तान मलिक हे सत्ताधरी पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्र्याचे भाऊ असल्यामुळे दादागिरी करत असल्याची टिका आता विरोधकांकडून केली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा