इन्वि'टेन्शन'

'तहरीक-ए-इन्साफ' पक्षाचे अध्यक्ष इमरान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी लिटल मास्टर सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानलाही निमंत्रण देण्यात आलं आहे. यापैकी नवज्योत सिंग सिद्धू यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला आहे.