सर्जिकल स्ट्राइक

भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केले असून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावरील हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि २५ ट्रेनरचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई दलातील ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला हादरा बसला आहे.