Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

तिथीचा हट्ट सोडा, शिवजयंतीसाठी मुख्यमंत्र्यांना कुणी केलं आवाहन?

यावर्षी शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार १९ फेब्रुवारी रोजी साजरी करा, असं आवाहन महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आलं आहे.

तिथीचा हट्ट सोडा, शिवजयंतीसाठी मुख्यमंत्र्यांना कुणी केलं आवाहन?
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांची जयंती (birth anniversary) महाराष्ट्रात दोन वेळेस साजरी केली जाते. एकदा तारखेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथीनुसार. परंतु यावर्षी शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार १९ फेब्रुवारी रोजी साजरी करा, असं आवाहन महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आलं आहे. 

राज्य सरकारच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती (shivaji maharaj birth anniversary) दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच तारखेनुसार साजरी करण्यात येते. तर शिवसेनेच्या वतीने मात्र महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. परंतु यंदा शिवाजी महाराजांची जयंती तिथी ऐवजी तारखेनुसार साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना करण्यात आलं आहे. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून करण्यात आलं आहे. खासकरून शिवजयंती (shivjayanti) याच महिन्यात साजरी होणार असल्याने महाराजांच्या जयंतीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी (ncp leader amol mitkari) यांनी हे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. मिटकरी यांनी यासंदर्भात एक पोस्टर आपल्या ट्विटर हँडलवर टाकलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांनी “तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीलाच शिवजयंतीची तारीख जाहीर करा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे. मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने त्यांच्या आवाहनामुळे सत्ताधारी पक्षात शिवजयंतीवरून धुसफूस होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

अद्याप तरी शिवसेनेकडून मिटकरी यांच्या आवाहनावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा