भाजपाचा विजयी जल्लोष


  • भाजपाचा विजयी जल्लोष
SHARE

नरीमन पॉईंट - मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐतिहासिक अशा विजयानंतर नरिमन पॉईंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात एकच विजयी जल्लोष करण्यात आला. आपला विजय साजरा करण्यासाठी अनेक नवोदित नगरसेवक भाजपा प्रदेश कार्यालयात जमले होते. कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. विजयोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग घेतला. सर्वांनी फडणवीस यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या