Advertisement

का लिहिलं भुजबळांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र?


का लिहिलं भुजबळांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र?
SHARES

मुंबई - ऑर्थर रोड कारागृहात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कैद असेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला पत्र धाडलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी सरकारनं तातडीनं पावल उचलली पाहिजेत, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल तीन पानी पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असं म्हटलं आहे.

या पत्रामध्ये भुजबळांनी नाशिकमधील येवल्याच्या शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर माडंली. शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा, जर हमीभाव मिळत नसेल तर त्याची कर्जमाफी व्हावी असंही भुजबळ म्हणतात.

‘शेतकऱ्याला सरकारकडून कोणतेही उपकार नको आहेत. त्यांना फक्त उत्पन्नावर आधारित रास्त भाव हवा आहे. जो आपण देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना भीक नको तर त्यांना त्यांच्या हक्काची कर्जमाफी देण्यात यावी. पण आज शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठी क्षमा याचना करावी लागत आहे.' असंही भुजबळ या पत्रात म्हणतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा