'अभद्र युती न करता लगेच निर्णय घ्यावा'

चेंबूर - महापालिकेत महापौर कोणाचा बसणार? शिवसेनेचा की भाजपाचा? यावर दोन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे. याकडे साऱ्यांचेच लक्ष्य लागले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि भाजपा या दोघांनीही चर्चा करून अभद्र युती न करता झटकन निर्णय घेऊन मोकळे झाले पाहिजे. भाजपा आणि शिवसेनेने सत्तेचा फॉर्म्युला ठरवला पाहिजे. नाहीतर निवडणुकीपूर्वीची कटूता संपण्याऐवजी वाढत जाईल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Loading Comments