'पालिका शाळांतील मध्यान्ह भोजनाचा मेनू बदला'

 Churchgate
'पालिका शाळांतील मध्यान्ह भोजनाचा मेनू बदला'
'पालिका शाळांतील मध्यान्ह भोजनाचा मेनू बदला'
See all

मुंबई - खिचडी, डाळभात, मुगाची खिचडी असा रोजचा बोअरिंग मेनू खाणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मेदूवडा, इडली, पावभाजी, घावणे असे पदार्थही द्या आणि सध्याचा मेनू बदला अशी मागणी शिक्षण समितीत केली. त्यामुळे लवकरच मध्यान्ह भोजनात व्हरायटी मेनू मिळण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने मेनू ठरवण्यासाठी आहारतज्ज्ञांची समिती नेमली असून, या समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारला पत्र पाठवून मेनू बदलासाठी विनंती करण्यात येणार आहे. मात्र शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणेच हा मेनू द्यावा लागतो, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. त्यावर हा मेनू बदलण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याला प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. खासगी शाळांमध्ये मुलांना मध्यान्ह भोजनासाठी वेगळा खाऊ दिला जातो. मात्र पालिका शाळेतील मुलांना तीचतीच खिचडी दिली जाते. त्यामुळे मुलांना इतर मुलांचा हेवा वाटतो, असा मुद्दा काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांनी मांडला होता. त्यावरील चर्चेच्यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

Loading Comments