Advertisement

मतदानासाठी राडा


SHARES

घाटकोपर - घाटकोपर पश्चिम इथल्या लिटील फ्लॉवर इंग्रजी हायस्कुलच्या मतदान केंद्रात मतदान सुरू असतानाच गोंधळ झाला. इथे संध्याकाळी चार वाजले तरी अडीच हजार मतदार रांगेत ताटकळत उभे होते. मतदानासाठी देण्यात आलेल्या खोलीमध्ये खिडकींची संख्या देखील कमी असल्यामुळे मतदार त्रस्त झाले आणि अचानक हा गोंधळ झाला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. एकीकडे मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह नसल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र येथे लोकांनी मतदान करायला मिळावे म्हणून राडाच घातला.

संबंधित विषय
Advertisement