Advertisement

‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार- उद्धव ठाकरे

कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असं सांगतानाच ‘चेस दी व्हायरस’ ही संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार- उद्धव ठाकरे
SHARES

‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचलं पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असं सांगतानाच ‘चेस दी व्हायरस’ ही संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांचा हाॅटस्पाॅट ठरू लागलेल्या वरळी, धारावी आणि मुंबईतील इतर भागातील रुग्णसंख्या कमी करण्यात मुंबई महापालिकेला चांगलंच यश आलं आहे.  (chase the virus concept will implement to all maharashtra for prevent covid 19 says cm uddhav thackeray)

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचं मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झालं.

हेही वाचा- मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं?- उद्धव ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसंच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचलं पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसंच सुरक्षित अंतर यावर भर देणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. पावसाळ्याचा कालावधी असल्याने कोरोनासोबतच साथीच्या आजाराची शक्यता विचारात घेत दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असं सांगतानाच कोरोनाचं निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा