Advertisement

बंडखोर अभिजीत चव्हाण शरद पवारांच्या भेटीला


बंडखोर अभिजीत चव्हाण शरद पवारांच्या भेटीला
SHARES

मुलुंड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत वॉर्ड क्रमांक 106 मधून अभिजीत चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यातच अभिजीत यांनी शनिवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

अभिजीत हे मुलुंडमधील वॉर्ड 106 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु तरीही पक्षाने उमेदवारीची माळ ही नंदकुमार वैती यांच्या गळ्यात टाकली. तेव्हा नाराजी व्यक्त करत अभिजीत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून याच वॉर्ड मधून निवडणूक लढवायचं ठरवलं. याच पार्श्वभूमीवर अभिजीत चव्हाण आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे.

कार्यअहवाल सुपूर्द करण्यासाठी तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली', अशी माहिती अभिजीत चव्हाण यांनी दिली. परंतु तरीही ऐन निवडणुकीत झालेल्या या भेटीमुळे वॉर्ड 106 मधील राजकीय परिस्थितीत काय उलाढाल होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा