Advertisement

शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील वस्त्रहरण प्रसंगाशी

पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे.

शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील वस्त्रहरण प्रसंगाशी
SHARES

कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे वाराणसीतील एका पोस्टरनं. महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाची तुलना कंगना-शिवसेना वादाशी करण्यात आली आहे.

पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये संजय राऊतही बसलेले दिसत आहेत. वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर लावलं आहे.

मिश्रा यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, कंगना आणि शिवसेना वादात महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांच्या संरक्षणासाठी पुढे आले आणि त्यांनी कंगनाला संरक्षण दिलं. या वादावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही चकार शब्द काढला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहे. कंगनानं बुधवारी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर अनेक शिवसैनिकांनी राग व्यक्त केला होता.

यानंतर ठिकठिकाणाहून कंगनाच्या विरोधात निषेध केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटलं आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा