महापरिनिर्वाण दिनाची जय्यत तयारी

 Chembur
महापरिनिर्वाण दिनाची जय्यत तयारी
महापरिनिर्वाण दिनाची जय्यत तयारी
See all

चेंबूर - मंगळवारी साजरा होत असलेल्या महापरिनिर्वाण दिनाची सध्या चेंबूर परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. चेंबूर रेल्वे परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दरवर्षी पालिकेकडून उद्यानाची सजावट करण्यात येते. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून पालिकेचे कर्मचारी उद्यान परिसरात साफ-सफाई आणि रंगरगोटी करताना पाहायला मिळत आहेत. दादर चैत्यभूमीप्रमाणेच चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्मारकाला आंबेडकर अनुयायांची मोठी गर्दी असते. तसेच अनेक नेतेमंडळी देखील याठिकाणी भेट देत असल्याने पोलिसांचा देखील याठिकाणी चोख बंदोबस्त असतो.

Loading Comments