...म्हणून मनसे सोडली!

Mumbai
...म्हणून मनसे सोडली!
...म्हणून मनसे सोडली!
See all
मुंबई  -  

बोरीवली - ‘मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हेच पक्षाविषयी नकारात्मक विधान करत असतील तर पुढे कसं लढणार' त्यामुळे मनसे सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक चेतन कदम यांनी सांगितलंय. बाळा नांदगावकर यांनी सोमवारी 'यापेक्षा वाईट परिस्थिती मनसेची काय होऊ शकते’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर चेतन कदम यांनी 'मुंबई लाइव्ह'ला माहिती दिली. मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नगरसेवक कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. चेतन कदम हे मनसेचे महापालिकेतील स्थायी सदस्य आहेत. चेतन कदम यांच्या रुपाने ऐन निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला मोठा मासा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रभाग क्रमांक 14 हा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे चेतन कदम यांच्या पत्नीला या प्रभागातून शिवसेनेतून उमेदवारी देण्यात येणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.