Advertisement

मोठे भुजबळ सुटले, मात्र छोट्या भुजबळांचा जामीन नाकारला


मोठे भुजबळ सुटले, मात्र छोट्या भुजबळांचा जामीन नाकारला
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने समीर यांचा जामीनाला तूर्तास नकार दिला आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणी समीर भुजबळ कैदेत

नाशिकचे माजी खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने तूर्तास नकार दिला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात व मनी लाँड्रिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याचा निकाल दिल्यानंतर आत्तापर्यंत ५३ जणांना जामीन देण्यात आला आहे. हे कलम अवैध ठवल्यानंतर राष्ट्रवदीचे नेते छगन भुजबळांनी आपल्या प्रकृत्तीचे कारण देत जामीन मिळवला.


ईडीचे वकील अनुपस्थित असल्याने जामीन नाही

या मुद्यावर आपला देखील जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी समीर भुजबळ यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, ईडीने समीर यांच्या बाबतची बाजू अद्याप मांडलेली नाही. ईडीतर्फे बाजू मांडणारे भारताचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे उपस्थित नसल्यामुळे ही बाजू मांडल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत न्यायाधिशांनी समीर यांच्या जामीनाला तूर्तास नकार दिला आहे. तसेच, या प्रकरणी पुढील तारखेची सुनावणी १५ मे ला ठेवली आहे. तसेच, न्यायाधिशांनी ईडीला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहे.



हेही वाचा

पंकज भुजबळ 'मातोश्री'वर, चर्चेला उधाण


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा