Advertisement

पंकज भुजबळ 'मातोश्री'वर, चर्चेला उधाण


पंकज भुजबळ 'मातोश्री'वर, चर्चेला उधाण
SHARES

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी अाज दुपारी ‘मातोश्री’वर दाखल झाले अाहेत. छगन भुजबळ यांची तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर पंकज भुजबळ यांनी मातोश्रीची वाट धरल्याने चर्चेला उधाण अाले अाहे.


फक्त सदिच्छाभेट

उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांच्यात तब्बल १५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. यावेळी उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा उपस्थित होते. पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली बैठक ही राजकीय नसून सदिच्छा भेट होती, असे समजते. मात्र छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला अाहे. 


संबंध तणावपूर्ण

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातील संबंध तणावाचेच राहिले हाते. मात्र नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात ठाकरे आणि भुजबळ कुटुंबियांमधील संबंध सुधारले होते.


‘सामना’तून भुजबळांना सहानुभूती

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून छगन भुजबळांची बाजू घेण्यात अाली होती. आता पंकज भुजबळ ‘मातोश्री’ची पायरी चढल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण पाहता, भुजबळ खरोखरच राष्ट्रवादीसोबत राहतील की अन्य पक्षाची वाट धरतील, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.


हेही वाचा -

सोमवारपासून भुजबळांची नवी इनिंग!

छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा काय अाहे? इथे वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा