Advertisement

पडत्या काळात शिवसेनेची साथ - भुजबळ


पडत्या काळात शिवसेनेची साथ - भुजबळ
SHARES

'शिवसेनेसोबत आपला २५ वर्षांचा ऋणानुबंध राहिला असून पडत्या काळात त्यांनी दोन चांगले शब्द काढले, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी बोलत होते.

तर 'जामीन मिळाल्यानंतर 'राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सर्वात पहिला फोन आला' असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.


'झाले मोकळे आकाश'

रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांनी पत्रकारांना पहिली प्रतिक्रिया देतांना, 'झाले मोकळे आकाश, अशी भावना व्यक्त केली.


ऋणानुबंध शिवसेना

'पडत्या काळात शिवसेनेने शब्दांचा आधार दिला. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिल्यामुळे काळजी असणारच आणि ऋणानुबंध असतातच'.


महाराष्ट्र सदन सुंदर, बनानेवाला अंदर

'महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचा मला आनंद आहे. भाजपच्या खासदारानं सांगितलं होतं, महाराष्ट्र सदन सुंदर आणि बनानेवाला अंदर. सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही ते शोधायला हवं', अशी प्रतिक्रियाही भुजबळांनी यावेळी त्यांनी दिली.


हेही वाचा - 

छगन भुजबळांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा