Advertisement

छगन भुजबळांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज


छगन भुजबळांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 2016 पासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाला खरा, पण प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  

गुरुवारी सकाळी त्यांना घरी जाण्याची मुभा दिल्यावर ते सांताक्रूझ इथे त्यांच्या घरी परतले. पण त्यांचे खासगी कौटुंबिक डॉक्टर परदेशातून आल्यावर लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

भुजबळ बोलणार

पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करणार आहेत.

कार्यकर्त्यांची रुग्णलयात रीघ 

कार्यकर्त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील? याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झालं आहे.

 

'या' अटींवर जामीन मंजूर

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांचं वय लक्षात घेता त्यांना जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा