Advertisement

बॅलेट पेपरद्वारे नाही तर ईव्हीएमद्वारेच मतदान - मुख्य निवडणूक आयुक्त


बॅलेट पेपरद्वारे नाही तर ईव्हीएमद्वारेच मतदान - मुख्य निवडणूक आयुक्त
SHARES

ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून काँग्रेससह अनेक पक्षांकडून सातत्यानं होतं आहे. बॅन ईव्हीएम अशी मागणीही होत असून त्यात नुकतच ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप हॅकर सय्यद शुजानं केल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. एकूणच ईव्हीएम संदर्भातील हा वाद लक्षात आगामी लोकसभा निवडणूका बॅलेट पेपरवर होणार का? अशी चर्चा होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी भारतात आता पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतलं जाणार नाही असं स्पष्ट करत केलं आहे. त्यामुळे आता बॅलेट पेपरच्या मागणीला आणि चर्चेला पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.


शुजाचा खळबळजनक आरोप

ईव्हीएम हॅकींगच्या आरोपानंतर अनेकदा केंद्रीय निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचं सांगत ईव्हीएम हॅकींगचे आरोप फेटाळून लावले आहेत. असं असतानाच हॅकर शुजानं २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप करत खळबळ उडवली होती. या आरोपानंतरही तात्काळ निवडणूक आयोगानं शुजाचे आरोप फेटाळून लावत ईव्हीएम सुरक्षित असल्याचा पुनरूच्चार केला. त्याचवेळी शुजाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली. तसेच त्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे आयोगानं तक्रारही नोंदवली होती. असं असलं तरी ईव्हीएम हॅकींगचा वाद सुरूच आहे आणि त्यामुळेच बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी होत आहे.


ईव्हीएम सुरक्षित

मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. यापुढे निवडणुकीत मतदान हे ईव्हीएम मशीनद्वारेच होणार असं स्पष्ट करत त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. ईव्हीएममध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, करत नाही असं म्हणत ईव्हीएमद्वारे निष्पक्ष, तटस्थपणे निवडणूका घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ईव्हीएमबाबत कुणाच्या काहीही तक्रारी असतील तर त्यांच्या तक्रारींचं नक्कीच निराकरण करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे बॅलेट पेपरचा काळ गेला असं म्हणत यापुढे बॅलेट पेपर पुन्हा येणार नाही, ईव्हीएमद्वारेच मतदान घेतलं जाणार अशी ठाम भूमिकाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी मांडली आहे.


हेही वाचा -

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट

बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा