Advertisement

मृत्यू झालेल्या गोविंदाला 10 लाखांची आर्थिक मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

दहीहंडी खेळाताना जखमी झालेल्या एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं.

मृत्यू झालेल्या गोविंदाला 10 लाखांची आर्थिक मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
SHARES

दहीहंडी खेळाताना जखमी झालेल्या एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं. हा विषय अधिवेशनातही उपस्थित झाला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या गोविंदाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये निधी दिला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “दहीहंडीत मृत्यू होणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या गोविंदांना राज्य सरकार आर्थिक मदत देईल. जखमी गोविंदांना मदत करण्याच्या संदर्भात मी महापालिका आयुक्त चहल यांना सांगितले आहे. मदत लगेच देता येत नाही, मात्र मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल. मृत्यू झालेल्या गोविंदाला १० लाखांची मदत दिली जाईल. राज्यातील गोविंदांनाही मदत दिली जाईल.”

विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदेश दळवी असे मृत गोविंदाचे नाव आहे. संदेश अवघ्या 23 वर्षांचा होता. विलेपार्ले येथील शिव संभू मंडळाचे तो सदस्य होता. मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दळवी कुटुंब आता सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

संदेशला प्रथम अंधेरी येथील कूपर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नानावटी हॉस्पीटलमध्ये ताबडतोब त्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्याच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ जमा झाली होती. ऑपरेशननंतरही त्याचे हृदय आणि मेंदूंची हालचाल मंदावली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संदेश दळवी याच्या मृत्यू नंतर सरकारी मदती वरुन राजकारण सुरु झाले आहे. संदेश दळवी याच्या मृत्यू नंतर सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही तसेच कुटुंबियांना मदतीची घोषणा केलेली नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे.

यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोविंदाच्या मृत्युचं कोणी राजकारण करू नये. सरकार संवेदनशील आहे. गोविंदाना प्रथमच 10 लाखाचा विमा दिला आहे. या मृत गोविंदाच्या कुटुंबियांना सर्व मदत सरकार देणार आहे. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का? असा प्रश्न दरेकरांनी उपस्थित केला.



हेही वाचा

विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, मदतीवरून राजकारण सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा