Advertisement

"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला", एकनाथ शिंदेंचा टोला


"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला", एकनाथ शिंदेंचा टोला
SHARES

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. उद्धव ठाकरेंच्या या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!

तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा तिरकस बाणही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सोडला.

दरम्यान, शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. कोण आलं, कोण गेलं याचा मला फरक पडत नाही. ज्यांना लढायचं असेल, त्यांनी माझ्यासोबत राहावं, पुन्हा नव्याने जोमाने शिवसेनेला उभा करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा