Advertisement

'राज्याच्या हितासाठी बाप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी'!


'राज्याच्या हितासाठी बाप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी'!
SHARES

राज्याच्या हितासाठी बाप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, यामुळे पुढील गणेशोत्सवही आपण येथेच करू, विरोधकांना मात्र इकडे येण्यासाठी वर्षे मोजावे लागतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

त्यांच्या वर्षा या निवास्थानी गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पुढील काळातही आपलीच सत्ता असेल, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील जनतेला गणेशोत्सव पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.



बाप्पांच्या चरणी केली प्रार्थना

ते म्हणाले की, मी गणेशचरणी प्रार्थना करतो की, या देशावर आणि राज्यातील जनतेवर जे विघ्न आहेत ते त्यांनी दूर करावित, प्रत्येक नागरिकांना, सुख, सामाधान आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावे, राज्यातील शेतकरी राजा सुखी व्हावा, ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी पाऊस पडावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

हे पर्व एक सामाजिक अभिसरणाचं पर्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वांना एकत्र करून एकसंघ झाला पाहिजे, यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सव पर्वाची सुरुवात केली. राज्यातील जनता सुखी व्हावी, यासाठीगणेश चरणी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.



'राजकारणावर बोलणार नाही'

आज आपण कोणत्याही राजकारणावर बोलणार नाही, मात्र पुढील गणेशोत्सव आपण इथेच साजरा करणार असून विरोधकांना सत्तेत येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागेल. कारण राज्याच्या हितासाठी गणेशाचे आशीर्वाद आमच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


'यांनी' लावली उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. यात महिला विकास व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, जयकुमार रावल, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार तारासिंग, राज पुरोहित यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा