Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,79,051
Recovered:
57,33,215
Deaths:
1,18,313
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,637
521
Maharashtra
1,24,398
6,270

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं


मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलिकॉप्टर प्रवास काही मानवताना दिसत नाही. हेलिकॉप्टर अपघातातून आतापर्यंत कितीतरी वेळा बचावलेल्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बुधवारी पुन्हा भरकटलं.

सांगली वरून कोल्हापूर येथील कोडोली इथं जाताना संध्याकाळी हेलिकॉप्टरला लोकेशन मिळालं नाही. त्यामुळे अर्धा तास हेलिकॉप्टर कोल्हापूर इथंच चकरा मारत राहिलं. पण शेवटी हेलिकॉप्टरला दिशा मिळाली नि मुख्यमंत्री सुखरूप नियोजित कार्यक्रमाला पोहचले.


नेमकं काय झालं?

बुधवारी मुख्यमंत्री दिवसभरातील बैठका आटपून कोडोलीला हेलिकॉप्टरने निघाले. सव्वा चारच्या सुमारास निघालेलं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लोकेशन न मिळाल्यानं भरकटल. जवळपास अर्धा तास हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होतं. यावेळी त्यांच्यासोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुखही होते.

भरकटलेल्या हेलिकॉप्टरला पृथ्वीराज देशमुख यांनी दिशा दाखवली नि शेवटी हेलिकॉप्टर वारणा हेलिपॅडवर उतरवलं. मुख्यमंत्री सुखरुप कार्यक्रमला पोहचले नि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा