Advertisement

'संविधान बचाव रॅली' कसली? ही तर 'पक्ष बचाव' रॅली- मुख्यमंत्री

विरोधकांनी काढलेली रॅली ही 'संविधान बचाव रॅली' नसून 'पक्ष बचाव रॅली' होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला फटकारलं. विरोधकांनी एकत्रितपणे काढलेल्या 'संविधान बचाव रॅली'ला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काढलेल्या 'तिरंगा रॅली'च्या समारोपाचं भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उद्गार काढले.

'संविधान बचाव रॅली' कसली? ही तर 'पक्ष बचाव' रॅली- मुख्यमंत्री
SHARES

महाराष्ट्रात ज्यांची दुकानदारी संपली तेच लोक जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी काढलेली रॅली ही 'संविधान बचाव रॅली' नसून 'पक्ष बचाव रॅली' होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला फटकारलं. विरोधकांनी एकत्रितपणे काढलेल्या 'संविधान बचाव रॅली'ला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काढलेल्या 'तिरंगा रॅली'च्या समारोपाचं भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उद्गार काढले.विकास झाल्यास दुकानदारी बंद

भाजप हा गरिबांचा पक्ष असून आम्ही त्यांच्या सन्मानार्थ मैदानात उतरलो आहोत. विरोधक स्वतः भ्रष्टाचारात इतके बुडाले आहेत की दुसऱ्या कुणावरही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याइतकी नितीमत्ता त्यांच्याकडे नाही. विकासावर तर ते बोलूच शकत नाहीत. कारण त्यांना ध्येय-धोरण अशा गोष्टी माहितीच नाहीत. देशाचा होणारा विकास त्यांना पाहवत नाही, कारण देशाचा विकास झाल्यास त्यांची दुकानदारी बंद होईल. म्हणून ते जाती धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र त्यांचा हा उद्देश कधीच सफल होणार नाही. कारण जेव्हा तिरंगा निघेल, तेव्हा भारतातील प्रत्येक माणूस हा तिरंग्यासोबत असेल, असंही ते म्हणाले.भाजपाचा आवाज

मुख्यमंत्र्यांनी तिरंगा रॅलीच्या समारोपाचं भाषण हिंदीत केलं. या भाषाणादरम्यान मध्येच त्यांचा आवाजही बसला. मात्र आवाज बसल्यानंतरही त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. हा आवाज भाजपाचा आवाज आहे, त्यामुळे तो कुणीही दाबू शकत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.
विरोधक आईला फसवत आहेत

संविधान हे आईसारखं आहे. विरोधक प्रत्यक्षात आईला फसवत आहेत. संविधानाने लोकशाही जिवंत ठेवली आहे. ज्यांच्या हातून सत्ता गेली, ते 'संविधान बचाव रॅली'च्या माध्यमातून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत अाहेत. तर आम्ही 'तिरंगा रॅली'च्या माध्यमातून समाजाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.डाॅ. आंबेडकरांचं नाव घेण्याची लायकी नाही

ज्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्या बाबासाहेबांचं नाव घेण्याचीही विरोधकांची लायकी नाही. जेव्हा इंदू मिलसाठी जागा देण्याची वेळ आली, तेव्हा सत्तेत असलेले आजचे विरोधक काहीच करू शकले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


रॅली कुठून कुठे?

चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तिरंगा रॅली सुरू झाली. ही रॅली शिवाजी पार्कपासून माटुंगा, रुपारेल कॉलेजजवळून सेनापती बापट मार्गे दादर रेल्वे स्टेशन ते फूल मार्केटकडून पुढे एल्फिन्स्टन रोड, हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगण( कामगार मैदान)पर्यंत काढण्यात आली होती.


हेही वाचा-

'संविधान बचाव'साठी बांधणार समविचारी पक्षाची मोट-शरद पवार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा