Advertisement

'संविधान बचाव'साठी बांधणार समविचारी पक्षाची मोट-शरद पवार


'संविधान बचाव'साठी बांधणार समविचारी पक्षाची मोट-शरद पवार
SHARES

भारताचं सविधान बदलण्याचा भाजपाचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी समविचारी पक्षाची मोट बांधत संविधान वाचवू, अशी ग्वाही सर्वपक्षीय 'संविधान बचाव रॅली'दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिली.


शिवसेनेशी युती? छे..छे...

संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांनी एका प्रकारे राजकारण ढवळून काढलं आहे. त्यातच शिवसेनं नुकतीच स्वबळाची डरकाळी दिली आहे. त्याअनुषंगानं शरद पवारांना २०१९ च्या निवडणुकांबद्दल विचारलं असता त्यांनी शिवसेनी कदापी युती करणार नसल्याचं जाहीर केलं. तर त्याचवेळी काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. २०१९ च्या निवडणुकांसाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी राहुल गांधी यांच्याशी दोनदा बोलणी झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची टक्कर भाजप आणि शिवसेनेशी होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.कोण कोण सहभागी?

संविधान बदलाचं वारं निर्माण करणाऱ्या भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांविरोधात विरोधी पक्षानी दंड थोपटत प्रजासत्ताक दिनी मुंबईत 'संविधान बचाव रॅली'चं आयोजन केलं होतं. या रॅलीत काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, भाजपाचे बंडखोर राम जेठमलानी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, जनता दलाचे शरद यादव, नॅशनल काँन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, खा. राजू शेट्टी, यांसोबत गुजरातच्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल असे बहुतांश सर्वच बडे नेते उपस्थित होते.'अशी' निघाली रॅली

दुपारी १२ वाजता मंत्रालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या संविधान रॅलीला सुरूवात झाली. सर्वच नेत्यांनी हातात हात घालून संविधान वाचवण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर ही रॅली गेट वे आॅफ इंडियाच्या दिशेने निघाली. या रॅलीत सर्वपक्षीय कार्यकर्ते हातात झेंडे, संविधानाची प्रतिकृती घेऊन चालत होते. रॅली 'गेट वे'ला पोहोचताच रॅली संपल्याची घोषणा करण्यात आली.

यानंतर संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्षाची मोट बांधत पुढची दिशा ठरवण्यासाठी लवकरच दिल्लीत एक बैठक घेण्यात येणार असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं. तर राहुल गांधी यांची भेट घेत त्यांनाही या संविधान बचाव चळवळीत सहभागी करून घेऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार

'मुंबई पोर्ट ट्रस्ट'ने सुरक्षेचा हवाला देत विरोधी पक्षाच्या 'संविधान बचाव रॅली'ला परवानगी नाकारली होती. ही रॅली 'गेट वे आॅफ इंडिया'ला संपणार असल्याने सरकारनेही रॅली न काढण्यासाठी दबाव वाढवला. पण सरकारला न जुमानता ही रॅली काढण्यात आली. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.हेही वाचा-

टफ फाईट! 'संविधान बचाव रॅली'विरोधात भाजपाची 'तिरंगा रॅली'

'संविधान रॅली'ला 'गेट वे'जवळ नो एण्ट्री


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा