मुख्यमंत्र्यांमुळे पक्षात गुंड - उद्धव ठाकरे

 Mumbai
मुख्यमंत्र्यांमुळे पक्षात गुंड - उद्धव ठाकरे

दहिसर - दहिसर परिसरात मंगळवारी शिवसेनेकडून प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना नेता विनोद घोसाळकर यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात गुंड भरले जे आता पोलिसांच्या डोक्यावर नाचतील अशी टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा अपमान केलाय. त्यामुळे त्यांना मुंबईकर माफ करणार नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading Comments