भाजपा सर्वात चांगली बँक - मुख्यमंत्री

 Ghatkopar
भाजपा सर्वात चांगली बँक - मुख्यमंत्री

घाटकोपर - मतदारांनी योग्य पक्षाला मतदान करणे हे बँकेत सोने ठेवण्यासारखे आहे. भाजपा ही सर्वात चांगली बँक असून त्यात मतदारांनी मतं दिली तर त्यांचा चांगला विकास होईल. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासारख्या खराब बँकांना मतं दिली तर त्यांचा विकास होणार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते घाटकोपर पूर्व मधील पंतनगर येथे झालेल्या वैद्य मैदानातल्या सभेत बोलत होते. तसेच रस्ते, कचरा आणि नाले सफाई हे सर्व घोटाळे शिवसेनेने केल्याचा आरोपही त्यांनी केला. मध्य वैतरणा धरणाला बाळासाहेबांचे नाव देण्यात आले. या धरणाच्या कामात प्रस्तावित तीन हजार कोटी रुपयांपेक्षा 921 कोटी जास्तीचे लागले. म्हणजे शिवसेनेने धरण बांधण्यात देखील घोटाळा केला असल्याचंही फडणवीस म्हणाले.

या वेळी मुंबई पालिकेत भाजपाचं सरकार आल्यानंतर नागरिकांना सोयी-सुविधा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सभेत सीएम अॅपचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. या अॅपच्या माध्यमातून मुख्यमंत्री आता प्रत्येकाच्या घरोघरी पोहचतील.

Loading Comments