तिरुपती बालाजीच्या चरणी मुख्यमंत्री

 Kasaiwada
तिरुपती बालाजीच्या चरणी मुख्यमंत्री

चुनाभट्टी - शीव, चुनाभट्टी येथील के. जे. सोमय्या मैदानावर आयोजित श्री व्यंकटेश्वर वैभवोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वैभवोत्सवाचं उद्घाटन आणि पूजा झाली. राधा फाउंडेशन आणि तिरुपती देवस्थान यांच्या वतीनं महाराष्ट्रात पहिल्यांदाच वैभवोत्सव होत आहे. या वेळी खासदार राहुल शेवाळे, तसंच भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ''भगवान बालाजीच्या आशीर्वादानंच गरिबांच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली असून त्यानुसारच राज्याची वाटचाल प्रगतीपथावर आहे. गरिबांच्या कल्याणासाठी राज्याची तिजोरी सदैव भरलेली राहील. तिरुपतीला जाऊ न शकणाऱ्या मुंबईतील भाविकांना या वैभवोत्सवामुळे इथेच बालाजींचं दर्शन घेता येणार आहे.'' 

भाविकांना 8 ते 12 नोव्हेंबर 2016 या कालावधीत श्री व्यंकटेश्र्वर वैभवोत्सवाचा लाभ घेता येणार आहे.

Loading Comments