Advertisement

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रणच नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यानं उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला गेले नाहीत.

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रणच नाही
SHARES

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान करण्यात आला. मात्र, सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून लगोलग वाद सुरू झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. 

निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती म्हणून उषा मंगेशकर यांचे नाव होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यानं उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला गेले नाहीत.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव वगळणं हे अपमानास्पद असल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार स्वीकारला. षण्मुखानंद सभागृहात आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते.

लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्यापासून दूर राहिले. भारत रत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. कला क्षेत्रातील अनेक दिग्गजाची या सोहळ्याला उपस्थिती होती.

मी सामान्यतः कोणताही पुरस्कार स्विकारत नाही. पण, लतादीदींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्विकारण्याचा मोह मला आवरता आला नाही. हा पुरस्कार मंगेशकर कुटूंबियांच्या प्रेमाचे प्रतिक आहे. लतादीदी सर्वांच्या होत्या. हा पुरस्कारही सर्वांचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

साडेचार दशकांपूर्वी माझी लतादीदींशी ओळख झाली. आमची भेट सुधीर फडके यांनी घडवून आणली. तेव्हापासून आजपर्यंत माझे त्यांच्या कुटूंबाशी ऋणानुबंध कायम आहेत. लता माझ्या मोठ्या भगिनी होत्या. त्या वयानेही मोठ्या होत्या व कर्मानेही मोठ्या होत्या, असंही ते यावेळी म्हणाले.



हेही वाचा

भाजप-शिवसेना संघर्ष दिल्लीत पोहोचला! BJP शिष्टमंडळ करणार तक्रार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा