Coronavirus cases in Maharashtra: 557Mumbai: 306Pune: 59Thane: 29Islampur Sangli: 25Ahmednagar: 20Nagpur: 16Navi Mumbai: 16Pimpri Chinchwad: 15Kalyan-Dombivali: 10Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Ratnagiri: 2Kolhapur: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Usmanabad: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 51BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अजितदादा, आपण उगीच इतकी वर्षे दूर राहिलो - मुख्यमंत्री

आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, पण आता एकत्र आलोच आहोत, तर चांगलं काम करून दाखवू, अशा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी व्यक्त केला.

अजितदादा, आपण उगीच इतकी वर्षे दूर राहिलो - मुख्यमंत्री
SHARE

अजितदादाइतके वर्ष आपण उगाच दूर होतो. मधली वर्षे आपण उगाच वाया घालवली. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, पण आता एकत्र आलोच आहोत, तर चांगलं काम करून दाखवू, अशा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा- फक्त राज्यातच का? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj jayanti) यांच्या जयंतीनिमित्त (shiv jayanti) शिवनेरी (shivneri) किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित शिवप्रेमींसमोर भाषण केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळही (chhagan bhujbal) उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी आणि अजितदादा (deputy cm ajit pawar) कार्यक्रम पाहात असताना एक कार्यकर्ता दादांना सांभाळा असं मला वळूनवळून सांगत होता. त्यावर मी आता उत्तर देतो. अजितदादा आपण मधली वर्षे उगाच घालवली. आधीच एकत्र यायला हवं होतं. पण आता एकत्र आलोच आहोत, तर चांगलं आणि विधायक काम करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो.

महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi government) हे माझं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. अशी भावना राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. लोकांच्या मनात ही भावना कायम राहावी, यासाठी आमचे प्रयत्न असतील.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: तपास राज्याकडेच राहणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचं भाषण सुरू असताना गर्दीतून अचानक एकाने ते शिवस्मारकाचं (shiv smarak) लवकर बघा, अशी मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी हसून दाद दिली. होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. शिवनेरी (shivneri) आणखी कशी सजावयची याकडेही आम्ही लक्ष देत आहोत. हे आपलं वैभव आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित विषय
संबंधित बातम्या