Coronavirus cases in Maharashtra: 443Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

फक्त राज्यातच का? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार

नुसत्या राज्यातच कशाला, तर संपूर्ण देशातच मध्यावधी निवडणुका घ्या, असं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी दिलं.

फक्त राज्यातच का? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार
SHARE

हिंमत असेल, तर पुन्हा निवडणुका घ्या आणि बहुमत मिळवून दाखवा, असं खुलं आव्हान विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis) यांनी नुकतंच महाविकास आघाडी (maha vikas aghadi)ला दिलं होतं. त्यावर नुसत्या राज्यातच कशाला, तर संपूर्ण देशातच मध्यावधी निवडणुका घ्या, असं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी दिलं.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवार समांतर तपासावर ठाम

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव (bhima koregaon violence, elgar parishad case) प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेतली.  यावेळी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची भाजपला गरज नाही. तर ते स्वत:च पडेल. त्यामुळं राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, त्याची तयारी भाजपकडून (bjp) केली जात आहे, असं भाजपकडून म्हटलं जात आहे. त्यावर तुमचं मत काय? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी पवारांना विचारला.

त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, अशा गोष्टी मी गांभीर्याने घेत नाहीत. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेस (congress) अशा तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा कारभार उत्तम रितीने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे विरोधकांचं कामच आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे, ते काम करत आहे, असं ते म्हणाले.

मध्यावधी निवडणुका राज्याच्या होत नाहीत, तर संपूर्ण देशाच्या होतात. लोकसभेची मध्यवधी निवडणूक घ्यायची असेल तर ते त्यांच्याच हातात आहे. भाजपाने (bjp) केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी,” असा खोचक सल्ला देखील पवारांनी दिला.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: तपास राज्याकडेच राहणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्याला प्रतिउत्तर देताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी भाजप महाअधिवेशनात केलेल्या भाषणातून हिंमत असेल तर पुन्हा एकदा निवडणुका घ्या आणि जनमत मिळवून दाखवा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर देताना पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या