Advertisement

बुलेट ट्रेनचं काय? मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचं (Bullet train) काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याचं उत्तर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

बुलेट ट्रेनचं काय? मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पदभार स्वीकारताच आरेतील कारशेडच्या (aarey car shed) कामाला स्थगिती देतानाच युती सरकारच्या काळातील प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचं (Bullet train) काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याचं उत्तर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

सामनाचे संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भविष्यावर परखडपणे भाष्य केलं. आपलं सरकार स्थापन होण्याआधी ५ वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने अनेक प्रकल्प निर्माण केले तसंच मंजूरही केले. जे नंतर पांढऱ्या हत्तीसारखे नंतर समोर आले. त्यांना आपण स्थगिती दिली. त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन (Bullet train) महाराष्ट्रात येणार की नाही? असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. 

हेही वाचा- कुणाल कामराला घ्यायचाय राज ठाकरेंसोबत पंगा, लाच देण्याची आॅफर

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले, सरकारचं काम विकास करणं आहे, हे खरं आहे. अलिकडेच मी मंत्रालयातून व्हिडिओ काॅन्फरसिंगच्या माध्यमातून नागपूर मेट्रोच्या (nagpur metro) दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. राज्यात विकासकामे सुरू आहेत, तर काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली, हे देखील खरं आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे, असं मला वाटतं. आपल्याला कोण बिनव्याजी कर्ज देत असेल, म्हणून गरज नसताना अंगावर घ्यायची गरज मला वाटत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीही काढायच्या, पांढरे हत्ती पोसायचे, हे योग्य नाही. 

बुलेट ट्रेनच्या (Bullet train) बाबतीत सुद्धा मला हेच वाटतं. बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला होणार आहे? त्यामुळे किती उद्योगधंद्यांना चालना मिळेल? हा प्रकल्प जर खरंच उपयोगाचा असेल, तर जनतेसमोर जाऊ. मग पुढं काय करायचं ते ठरवू, असं मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले.  

पण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm narendra modi) यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे, असं राऊत यांनी सांगताच. असेल. हा ड्रिम प्रोजेक्ट (dream projec) जरी असला, तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती देखील समोर असते. स्वप्न नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- भाजपच्या काळात फोन टॅपिंग? चौकशीसाठी समिती स्थापन

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो ३ (metro 3) प्रकल्पाच्या आरे कारशेडच्या (aarey carshed) कामाला स्थगिती देतानाच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग इ. प्रकल्प गुंडाळण्यात येतील, असं म्हटलं जात होतं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा