Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

योगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा

बाॅलिवूडमधील कलाकार, निर्मात्यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याची अधिकृत घोषणा केली.

योगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा
SHARES

बाॅलिवूडमधील कलाकार, निर्मात्यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याची अधिकृत घोषणा केली. सोबत आम्ही मुंबईतून काहीही हिसकावून घेत नाहीय. ही सगळी खुली स्पर्धा आहे, असं म्हणत ठाकरे सरकारला देखील टोला लगावला. 

योगी आदित्यनाथ हे सध्या दोन दिवसांसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आले असून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी ते उद्योजक आणि चित्रपटसृष्टीतील गुंतवणूकदारांना आवाहन करत आहेत. यासाठी त्यांनी दिवसभरात फिल्म सेलिब्रिटी आणि उद्योजकांच्या भेटी देखील घेतल्या. यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ यांनी उ.प्रदेशात भव्यदिव्य फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली. 

हेही वाचा- उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेची योगींवर टीका

यासंदर्भात माहिती देताना आदित्यनाथ यांनी सांगितलं, उत्तर प्रदेशमध्ये जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे. नोएडा येथील यमुना प्राधिकरणाजवळ ही फिल्म सिटी उभी करण्यात येईल. जेवर या आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करण्यात येईल. या फिल्म सिटीला उत्तर प्रदेश आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. यासंदर्भात चित्रपट क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी मी चर्चा केला. सर्वांनी या कामात रस दाखवल्याचा मला आनंद आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

सोबतच फिल्म सिटी उभारताना कुणीही कुणाचं काहीही हिसकावून घेत नाहीय. ही सगळी खुली स्पर्धा आहे. कोण चांगल्या सुविधा देणार यावर सगळं अवलंबून आहे. मुंबईतील फिल्म सिटी आहे, तशीच काम करत राहील. तर उत्तर प्रदेशातील फिल्म सिटी आपलं काम करेल. नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार उत्तर प्रदेशात नवीन फिल्म सिटी उभी राहील, असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं. 

त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ) मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा हा कुटील डाव आहे. यासाठी उद्योजकांना धमकावण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

(cm yogi adityanath announces film city in uttar pradesh)

हेही वाचा- महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा